रत्नागिरीत तरुण क्रीडा शिक्षकाचा अपघाती मृत्यू

रत्नागिरी :- परटवणे ते साळवी स्टॉप या रस्त्यावर उद्यमनगर, चंपक मैदानासमोर रस्त्यात गुरे आडवी आल्यानेत्यांना धडकून रत्नागिरीतील दुचाकीस्वार क्रीडा शिक्षक ओंकार बाणे यांचा अपघात झाला. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ओंकार बाणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रात्री साडेदहा वाजेपर्यंत घरीच असलेले ओंकार बाणे रात्री दुचाकी घेऊन शहरात आले . रात्री घरी जाण्यासाठी निघाले असताना साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उद्यमनगर चंपक मैदानासमोर गुराला धडकल्याने त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. बराच वेळ ते रस्त्यात पडलेल्या अवस्थेत होते . यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये गेल्या ६ वर्षापासून क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते .

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE