रत्नागिरी : दुर्धर आजार किंवा अकस्मात अपघाताने अपंगत्व आलेल्या अनेकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. दैनंदिन जीवनातील कामे देखील त्यांच्यासाठी असह्य होऊन बसतात. अशाच आपल्या समाजातील आपल्या गरजू व्यक्तींना कमीत कमी दैनंदिन कामे करता यावीत यासाठी जयपूर फूट – कृत्रिम अवयव प्रत्यारोपण उपक्रम रोटरी क्लबने आयोजित करायचे योजले आहे.
अपंगत्वामुळे येणाऱ्या अडचणी ह्या भरपूर आहेत सगळ्याच काही कृत्रिम अवयवांनी पूर्ण करता येत नाहीत पण दैनंदिन गरजा ह्या लाभाकर्त्याच्या पूर्ण होऊदेत हि अध्यक्ष आणि क्लबची मनापासून इच्छा आहे.
हा कॅम्प मार्च २०२४ मध्ये रत्नागिरी येथे आयोजित करण्यात येणार आहे.
लवकरात लवकर लाभार्थीनि नावे नोंदवून या समाजउपयोगी कामात मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या जवळील नातेवाईक , मित्र , शेजारी यांना हा संदेश पोहचवून या कार्यात आपले बहुमूल्य योगदान देण्यास कळवण्यात आले आहे
।। एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ।।
या संदर्भात अधिक माहितीसाठी रोटे. वेदा मुकादम – जयपूर फूट प्रोजेक्ट लीड -९९२३९९३१९९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे करण्यात आले आहे.