वीज कंपनीतील भरती प्रक्रिया थांबवून कंत्राटी कामगारांना न्याय देणार

अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांची शिष्टमंडळाला ग्वाही

    उरण (विठ्ठल ममताबादे ) : राज्याच्या अपर मुख्य सचिव ( ऊर्जा ) श्रीमती आभा शुक्ला यांनी वीज कंत्राटी कामगारांच्या शिष्टमंडळा सोबत मंगळवार दि.१९ मार्च २०२४ रोजी त्यांच्या दालनात मीटिंग घेतली. राज्यातील महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांनी ५ मार्च ते नऊ मार्च बेमुदत काम बंद आंदोलन केले होते या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले

    • १) हरियाणा राज्यातील कंत्राटदारमुक्त रोजगार करिता उपकंपनी बाबतीत अभ्यास करून लवकरच निर्णय घेतला जाईल.
    • २ ) भरती प्रकीया मध्ये कंत्राटी कामगारांना वयाची सवलत व २५ मार्क देण्यात येतील या करिता भरती प्रकीया थांबविण्यात येईल व फॉर्म भरण्यास मुदत वाढ देण्यात येईल.
    • ३ ) ८ वी पास आय टी आय व १० वी पास आय टी आय च्या कामगारांना भरती प्रकीया मध्ये समाविष्ट करण्यात येईल.
    • ४ ) कामगारांची सेवा जेष्ठता यादी तयार करून या नुसार सर्व्हीस बेनिफिट देण्यात येईल.
    • ५ ) वयाच्या ६० व्या वर्षी पर्यंत शाश्वत रोजगार करिता आवश्यक त्या तरतूदी कल्याणकारी योजना राबविण्यात येईल.
    • ६) कामगारांना ऐस्क्रो बँक खात्याद्वारे थेट खात्यात वेतन दिले जाईल.
    • ७ ) कामगारांना मेडिक्लेम व अपघाती मृत्यू योजना नुसार लाभ देण्यात येईल.
    • ८ ) आंदोलना नंतर ज्या कामगारांना कामावर रुजू करून घेतले नाही त्या कामगारांना कामावर रुजू करून घेतले जाईल

    या मीटिंगमध्ये समितीचे राज्य संघटक सचिन मेंगाळे, उमेश आनेराव नचिकेत मोरे, कमलेश राणे, राजन भानुशाली, कृष्णा भोयर उपस्थित होते. तिन्ही वीज कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत पुन्हा एक बैठक घेण्यात येईल त्या वेळी पगारवाढ व अन्य महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.

    Digi Kokan
    Author: Digi Kokan

    Leave a Comment

    READ MORE

    best news portal development company in india

    READ MORE