कोकण रेल्वे मार्गावरील पोरबंदर- कोचुवेली एक्सप्रेस उद्या जादा डब्यासह धावणार!

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या पोरबंदर ते कोचुवेली या साप्ताहिक एक्सप्रेसला वाढती गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पोरबंदर ते कोचुवेली (20910) या गाडीला दिनांक 21 मार्च 2024 रोजी च्या फेरीसाठी तर कोचुवेली ते पोरबंदर (20909) या मार्गावर धावताना दिनांक 24 मार्च 2024 च्या फेरीसाठी स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त कोच जोडण्यात येणार आहे.
या गाडीला अतिरिक्त कोच जोडण्यात आल्याने प्रतीक्षा यादीवरील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE