उरण दि ८ (विठ्ठल ममताबादे ) : दिनांक ८/४/२०२४ रोजी बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर तालुक्यात महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रचार रॅलीमध्ये उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शवला.

उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे परीक्षित ठाकूर तालुका अध्यक्ष, तुषार ठाकूर शहर अध्यक्ष, समत भोगले युवा अध्यक्ष यांनी लोकसभेचे उमेदवार सुनेत्रा अजितदादा पवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उरण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी रात्रंदिवस अविरत मेहनत घेत आहेत. पक्षाचा, पक्षाचे कार्य व विचारांचा तळागाळात प्रचार व प्रसार करीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उरण तालुक्याच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रचारात सहभागी होत सुनेत्रा पवार यांच्या कार्याचा प्रचार केला.
