लोकसभा निवडणूक २०२४ | नारायण राणे यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ रत्नागिरीत येणार!

  • ना. नितीन गडकरी यांच्यासह राज ठाकरेही मैदानात उतरणार

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दि दि.१ मे रोजी रत्नागिरी येणार असल्याचे बोलले जात आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे केंद्रात मंत्री असलेले नारायण राणे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यांची इंडि आघाडीच्या विनायक राऊत यांच्यासोबत आहे.

ना राणे यांच्या प्रचारासाठी दिनांक १ मे २०२४ ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रत्नागिरीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत सुत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्र दिनी योगी आदित्यनाथ हे नारायण राणे यांच्यासाठी रत्नागिरीत प्रचाराचे मैदान गाजवतील, असे बोलले जात आहे.

ना. राणे यांच्या प्रचारासाठी दि. 26 एप्रिल 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजापुरात प्रचार सभा होणार आहे. राणे यांच्या प्रचारासाठी नीतीन गडकरी, योगी आदित्यनाथ तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे देखील दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE