- मुंबई गोवा मार्गावर ४ जून पर्यंत तर गोवा मुंबई मार्गावर ५ जून पर्यंत धावणार
रत्नागिरी : आठवड्यातून तीन दिवस धावणारी अतिरिक्त समर स्पेशल ट्रेन उद्या दिनांक 26 एप्रिल 2024 पासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्यातील थिवी दरम्यान ही गाडी ४ जूनपर्यंत चालवण्यात येणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी (01017) ही गाडी दिनांक 26 एप्रिल 2024 ते 4 जून 2014 पर्यंत एकूण 18 फेऱ्या करणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी दरम्यान ही गाडी दर शुक्रवार, रविवार, तसेच मंगळवारी धावेल.
याचबरोबर उलट दिशेच्या प्रवासात थीवी ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान ही गाडी (01018) दिनांक 27 एप्रिल 2024 ते 5 जून 2024 या कालावधीत आठवड्यातील शनिवार, सोमवार आणि बुधवारी धावणार आहे. दोन्ही दिशांनी मिळून ही गाडी 36 करणार आहे.
उद्या दिनांक 26 एप्रिल 2024 पासून कोकण रेल्वे मार्गावर धावणारी ही गाडी 17 एलएचबी डब्यांची असेल.



असे असेल वेळापत्रक
ही गाडी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल आणि गोव्यातील ठेवी स्थानकावर ती दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी थीवी स्थानकावरून सांगा विचार वाजून 35 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे लोकमान्य टिळक टर्मिनस लाती तीन वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल.
एलटीटी-थीवी दरम्यान थांबणार या स्थानकांवर
ही अतिरिक्त समर स्पेशल गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, तसेच सावंतवाडी स्थानकावर थांबे घेणार आहे.
- हे सुद्धा वाचा : Konkan Railway | रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत पावसाळ्यात गोवा वंदे भारतसह तेजस एक्सप्रेस रद्द?
- Konkan Railway | उधना-मंगळुरू स्पेशल फेअर ट्रेन ५ जूनपर्यंत धावणार!
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली!
