निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सक्रीय कामकाज करण्याचे निर्देश
रत्नागिरी, दि. 2 : कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी येथील जिल्हा माहिती कार्यालयातील माध्यम कक्षाला आज भेट दिली. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सक्रीय कामकाज करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी विभागीय माहिती कार्यालयातील माहिती सहाय्यक प्रविण डोंगरदिवे, लेखापाल गंगाराम बांगारा, वरिष्ठ लिपिक योगेश मोडसिंग, लिपीक संदीप गोवळकर उपस्थित होते.
माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये तसेच समाज माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या राजकीय जाहिराती प्रमाणित केल्या जातात. वृत्तपत्रात विविध वाहिन्यांवर तसेच समाज माध्यमांवर जाहिराती, बातम्या यांच्यावर लक्ष ठेवले जाते. त्याचबरोबर खर्च नियंत्रण कक्षाकडे जाहिरातींच्या खर्चाबाबतचा अहवाल दररोज दिला जातो.
डॉ. मुळे यावेळी म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जबाबदारीने निवडणूक विषयक कामकाज करावे. त्याचबरोबर निवडणूक कामकाज विषयक बातम्यांना योग्य प्रसिध्दी माध्यमांमध्ये प्रसिध्दी देण्याबाबतही कामकाज करावे. समाज माध्यमांवरही त्याबाबतची छायाचित्रे, चित्रीकरण यांना प्रसिध्दी मिळेल, याविषयी सक्रीय रहावे.
