रत्नागिरी : शहरातील दामले हायस्कूल येथील मतदान केंद्रावर भेट देवून निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी वेबकास्टींगची रंगीत तालिम घेतली.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई उपस्थित होते. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया दि. ७ मे २०२४ रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंह यांनी मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आलेल्या वेब कास्टिंग सुविधेची पाहणी केली.
