चिरनेर येथे १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा

उरण दि ११ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील चिरनेर या इतिहास प्रसिद्ध गावातील कातळपाडा येथील दत्त मंदिराच्या प्रांगणात छावा प्रतिष्ठानतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती सोहळा मंगळवारी १४ मे रोजी ऐतिहासिक वातावरणात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती, छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सुभाष कडू यांनी दिली.

सध्या या सोहळ्याची जोरदारपणे तयारी सुरू असून, छावा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्व तयारीच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. यात प्रामुख्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती रेवसकर यांच्या हस्ते करण्यात येईल. यावेळी जन्म सोहळ्याचे पाळणा गीत सादर करण्यात येईल.

या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सत्यनारायणाच्या महापूजेचा मान सरिता योगेश खारपाटील यांना देण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराजांची पालखी मिरवणूक हे या सोहळ्याचे आकर्षण असणार आहे. या पालखी मिरवणुकीत शिवप्रेमीं बरोबर ग्रामस्थ तसेच ह भ प गणपत महाराज, ह भ प हासूराम बाबा महाराज यांच्या अध्यात्मिक पौर्णिमा मंडळाचे वारकरी, माऊली हॉर्स फार्मचे प्रशांत घरत सहभागी होणार आहेत. यावेळी महिला लेझीम पथकाची झलक पाहायला मिळणार आहे. सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.

या महाप्रसादासाठी अन्नदाते तेजस डाकी यांचे सौजन्य लाभले आहे. रात्री नऊ वाजता बळवली येथील ह. भ. प. अमित महाराज यांचे कीर्तन होईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, माजी आमदार मनोहर भोईर, उद्योजक तेजस डाकी, राष्ट्रवादी उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, माऊली इंटरप्राईजेसचे एकनाथ पाटील, शिवसेना उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE