जिद्द-चिकाटीला सलाम !! लांजातील लोकशाहीर विकास लांबोरे ४० व्या वर्षी उत्तीर्ण झाले एमपीएससी!
लांजा : जिद्द, चिकाटी आणि इच्छा असल्यास मार्ग सापडतो. प्रसिद्ध लोकशाहीर, गीतकार लांजा तालुक्यातील केळबे गावचे सुपुत्र विकास सखाराम लांबोरे हे 40 व्या वर्षी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले असून आता ते महसूल विभागात शासकीय सेवेत रुजू होणार आहेत. यातून स्पर्धा परीक्षा ‘क्रॅक’ करण्याचा मूळमंत्र आणि आदर्श विकास लांबरे यांनी घालून दिला आहे.
लोकशाहीर विकास लांबोरे यांनी गलेलठ्ठ पगाराची खासगी नोकरी सोडून कोणत्याही परिस्थितीत स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी सेवक बनण्याचे स्वप्न बाळगले होते. अखेर ते आपली धर्मपत्नी यांच्या पाठिंब्यावर यश संपादन केले आहे विकास लांबोरे हे लांजा तालुक्यातील केळंबे विवली धनगर वाड्यातील रहिवासी आहेत. अतिशय दुर्गम आणि खडतर असलेला हा धनगरवाडा आज विकास लांबोरे यांच्या यशाने आनंदून गेला आहे. विकास लांबोरे यांनी बाळालेली जिद्द आणि चिकाटी मेहनत फळाला आली आहे. विकास यांनी अत्यंत गरीब परिस्थितीत आणि प्रतिकूल परिस्थितीत गावातील प्राथमिक शाळेत धडे घेतल्यानंतर माध्यमिक शाळा कुवे आश्रम शाळा येथे शिक्षण घेतले. बारावीपर्यंतचे शिक्षण शिपोशी येथे झाले वडिलांचा पारंपरिक दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय व्यवसाय होता. केळवे धनगर वाड्यातून दररोज सात किलोमीटर पायी येजा करून दूध डेरी वर दूध टाकण्याचे काम करून शेतीवाडी करून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे पदवी शिक्षणासाठी मुंबई गाठली. पदवी करता करता पार्ट टाइम नोकरी करून त्यांनी पदवी संपादन केली.
विकास यांना लहानपणापासून लोककलेची आवड होती. धनगर वाड्यात शक्ती तुरा या लोककलेची परंपरा होती विशाल लांबोरे या शाहिरांच्या जडणघडणीत विकास लांबोरे यांनी लोककला आत्मसात केली मुंबईत या लोककलेला आधुनिक टच दिला विकास लांबोरे यांची कोकणातील पर्यटन अनेक उत्सव परंपरा यावरील स्वरचित गीते गाजली. माझा लांजा ऐटीत बसलाय हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. स्वतः विकास यांनी पुढाकार घेऊन नमन जाखडी शक्ती तुरा या लोककलेला सरकारी दरबारी प्रतिष्ठा देण्यासाठी पुढाकार घेतला. गीतकार आणि शाहीर म्हणून त्यांची लोकप्रियता आहे.
रिलायन्समध्ये त्यांना चांगल्या पगारांची नोकरी होती विकास यांच्याकडे एक दूरदृष्टी आणि जिद्द होती. शासकीय सेवेत रुजू होण्याचे त्यांचे स्वप्न होते अचानक त्यांनी वर्षभरापूर्वी रिलायन्सचा राजीनामा देऊन स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पुणे येथे दाखल झाले. स्वाध्याय स्वाध्यायन सुरू केले अहिल्यादेवी अभ्यासक्रमामध्ये अभ्यासिकेमध्ये राज्यसेवा लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला ना कोणताही क्लास लावला नाही. नोकरी सोडण्याचा कठोर निर्णय त्यांनी आपल्या पत्नीला सांगितला आता वय झाले कशाला परीक्षा? अशी नकारघंटा न लावता पत्नीने विकास यांना धीर आणि पाठिंबा दिला. पत्नीची प्रेरणा या जोरावर आणि आपले पुढे कसे होणार मुलांचे कसे होणार या चिंतेत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. राज्य राज्यसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात विकास लांबोरे यांनी क्रॅक केली आहे. ही गोष्ट कळल्यानंतर यांच्या पत्नी आणि कुटुंबाला कुटुंबाला आनंद झाला.
दरम्यान, 40 व्या वर्षी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन लांबोरे यांनी इतरांपुढे आदर्श घातल्याने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.