Mumbai-Goa Highway | लांजानजीक आंजणारी घाटात महामार्गावर टँकर उलटून वाहतूक ठप्प

लांजा : मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावर आंजणारी घाटात मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास रसायन वाहतुकीचा  टँकर उलटून झालेल्या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प  पडली होती. अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा नजीक अपघातग्रस्त झालेला  टँकर हटवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस घटनास्थळी तातडीने रवाना झाले होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE