निरामय योग संस्थेच्या साधकांतर्फे रत्नागिरीत १५ जून रोजी रक्तदान शिबिर


रत्नागिरी : रत्नागिरीतील नामांकित योगसंस्था  ‘निरामय’चे आंतरराष्ट्रीय दर्जाप्राप्त योगगुरू श्री. विरू स्वामी सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निरामयचे साधक एक सामाजिक उपक्रम म्हणून “ रक्तदान “ करणार आहेत. रेडक्रॉस सोसायटी, रत्नागिरी येथे शनिवार दि. १५ जून २०२४ रोजी सकाळी ०८.०० ते १२.०० या वेळेत हे रक्तदान शिबीर होणार आहे.


निरामय योग संस्थेमध्ये अनेक योगप्रेमी नियमित प्रत्यक्ष योगाचे प्रशिक्षण घेत असतात. निरामय योगसंस्थेकडे अॅानलाईन योग प्रशिक्षणाची उत्तम सुविधा असल्याने देश-विदेशातील अनेक साधक याद्वारे निरामयशी जोडले गेलेले आहेत.


या सामाजिक उपक्रमांत इतरही रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन “ निरामय “ योगसंस्थेतर्फे करण्यात येत आहे.
सर्व रक्तदात्यांना कार्ड व सर्टिफीकेट्स देण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी 90288 99412 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE