लांजा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लांजा तहसील कार्यालयात अर्ज घेणाऱ्यांची आणि उत्पन्न दाखलल्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगर पंचायतीमधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक आणि पदाधिकारी श्री. राजेश हळदणकर यांनी लांजा तहसीलदार यांना लांजा तालुक्यास्तवरील ग्रामपंचायतीमध्ये उत्पन्न दाखला व अधिवास प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिर लावण्यात यावे, अशी मागणी निवेदन आज मंगळवार सादर केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य शासनाने जाहीर केल्यानंतर योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. १५ जुलै २०२४ पर्यंत अर्ज देण्याची मुदत असल्याने लांजा तहसील येथे उत्पन्न दाखला आणि अधिवास दाखल्यासाठी मोठी गर्दी झाली आह. तहसीलच्या आवारातील सेतू कार्यालयात मोठी गर्दी झाल्याने तालुक्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये यासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठी शिबिर लावण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटांनी केली आहे.
यावेळी शिवसेना पदाधिकारी राजेश हळदणकर यांनी नायब तहसीलदार सौ. उज्वला केळुस्कर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले
