कुटरे येथे कृषीविश्व कृषिदूत संघातर्फे कृषिदिन उत्साहात साजरा

चिपळूण : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातील ‘कृषिविश्व’ कृषिदूत संघातील ऋषिकेश क्षीरसागर, तुषार यादव, अनिकेत मस्के, संग्राम पाटील, सुमित सावंत, यश मगर, सुयश शिंदे, आदित्य शिरसाट, शुभम हराळे, अतुल निळे, नितीश वाली, संदेश डोमाळे, ओंकार फाळके यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जे. वाय. शिर्के हायस्कुल कुटरे येथे महाराष्ट्र कृषिदिन साजरा केला.

सदर कार्यक्रमानिमित्त हायस्कूल ते कुटरे बाजारपेठेपर्यंत ‘जय जवान जय किसान; शेतकऱ्यांचा विकास, देशाचा विकास’ अशा घोषणा देत कृषिदिंडी काढण्यात आली. तुषार यादव यांनी विद्यार्थ्यांना कृषिदिनाचे महत्व पटवून दिले. कृषिदिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धांचे प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षीस वितरण तसेच वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी आणलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन यावेळी भरवण्यात आले होते.

या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून उपसरपंच सुरभी जाधव उपस्थित होत्या. तसेच सदस्य अमरदीप कदम, नितेश मोहिते, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE