- रस्त्यावर अचानक गुरे आल्याने अपघात
खेड : तालुक्यातील खेड आगाराची आंबवली गावाकडे जाणारी बस उलटून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थीननी जखमी झाल्या. रस्त्यावर अचानक गायी आल्याने नियंत्रण सुटून हा अपघात झाला. गुरुवारी सायंकाळी 3.30च्या सुमारास ही घटना घडली. अपघातात अन्य काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.

या अपघातात दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या असून त्यांना शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे तसेच स्थानिक ग्रामस्थांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातानंतर बसमध्ये अडकून राहिलेल्या प्रवाशांना ग्रामस्थांच्या मदतीने चालक व वाहक यांनी बस बाहेर काढले.
