लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील काजळी नदीवरील आंजणारी येथील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचा अहवाल देऊनही अतिवृष्टीमध्ये या पुलावरील वाहतूक सुरू असल्याने वाहनधारकांच्या पोटात भीतीचा गोळा येत आहे.
पुलाचा संरक्षक कठडा, कमानी पिलर हे धोकादायक स्थितीत आहेत. नदी पूल असलेला माती भराव ही पुराच्या पाण्यामुळे हळूहळू धूप होत असल्याचे दिसून येत आहे. काजळी नदीने अतिवृष्टीमध्ये इशारा पातळी ओलांडल्यानंतर या पुलाच्या वाहतुकीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पुलालगतच्या नवीन पर्यायी पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे सार्वजनिक बांधकाम महामार्ग विभागाने मार्च 23 मध्ये आंजणारी पूल जीर्ण झाल्याचा अहवाल सार्वजनिक रस्ते विभागाकडे दिला आहे.
या या पुलाच्या धोकादायक स्थितीबाबत महामार्ग विभागाचे अभियंता अरविंद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आणणारी पूल धोकादायक असल्याचा अहवाल मार्च 23 मध्ये सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाला देण्यात आलेला आहे. काजळी नदीने इशारा पातळी ओलांडल्यानंतर या पुलावरील वाहतूक बंद करण्यात येते. मात्र पुलाला सद्यस्थितीत कोणताही धोका नसल्याचे सांगितले. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात 2014 मध्ये या ब्रिटिशकालीन पूलाला पर्याय नवीन पुलाचे काम सुरू झालं होते. मात्र, न्यायालयीन प्रकरणामुळे उशिर झाला आहे.
