रत्नागिरी : महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी रेल्वेबरोबरच राज्य मार्ग परिवहन महामंडळही सज्ज झाले आहे. दिनांक 2 ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत एसटीच्या ४३०० बसेस कोकणात विविध ठिकाणी सोडल्या जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 800 बसेसने अधिक आहे.