रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाचा तृतीय वर्ष वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा सेमिस्टर-६ चा निकाल नुकताच जाहीर झाला.त्यात विज्ञान शाखेच्या रसायनशास्त्र व प्राणीशास्त्र विषयाचा निकाल शंभर टक्के लागला असून रसायनशास्त्र विभागात गार्गी विलणकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला तर प्राणीशास्त्र विभागात काश्मिरा कोठावळे प्रथम आली आहे. : वाणिज्य शाखेचा निकाल 85.71 टक्के लागला असून BM ग्रुपमध्ये सलोनी सावंत हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला तर अकाऊंट ग्रुपमध्ये कु.प्रतीक माटेल प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संस्था पदाधिकारी, प्रभारी प्राचार्या सौ मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ.वसुंधरा जाधव, वाणिज्य विभागप्रमुख निलोफर बन्नीकोप, विज्ञान विभागप्रमुख वैभव घाणेकर, इतर प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
देव- घैसास- कीर महाविद्यालयाचा तृतीय वर्ष विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ८५.७१ टक्के
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |