जे.एन.पी.टी. भवनासमोर ग्रामस्थांचे उद्या एक दिवसीय उपोषण

उरण (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील जसखार गाव हे जे.एन.पी. टी. प्रकल्पग्रस्त बाधित गाव आहे.युवा सामाजिक संस्था जसखार व ग्रामस्थांनी प्रशासनासोबत मागील अनेक वर्षे न्याय मिळावा यासाठी चर्चा केल्या.विविध मागण्यासाठी विविध पाठपुरावा केला होता. कायदेशीर पत्रव्यावहार सुद्धा केला होता.परंतु जेएनपीटी प्रशासनाकडून  जसखार गावाला न्याय देण्यात आला नाही. जेएनपीटी प्रशासनाने आजपर्यंत जसखार ग्रामस्थांच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या नाहीत.म्हणून  जसखार गावाला न्याय मिळावा यासाठी बुधवार दि. 15/6/2022 रोजी युवा सामाजिक संस्था जसखार या सामाजिक संस्थे तर्फे जे. एन. पी. टी. प्रशासन भवनासमोर एक दिवसीय उपोषण करण्यात येणार आहे.

रत्नेश्वरी आईची मंदिराची जेएनपीटीने नव्याने बांधलेल्या उड्डाणपूलामुळे दुरावस्था झालेली आहे. तरी त्याची संपूर्ण जबाबदारी जे.एन.पी.टी.ने घ्यावी. तसे लेखी स्वरूपात पत्र ग्रामपंचायतीकडे द्यावे. या प्रमुख मागणीसह एकूण 14 मागण्यासाठी एकदिवसीय उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती युवा सामाजिक संस्था जसखार यांनी दिली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE