मुंबई : राज्य शासनाने एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्व ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व १६३ शासकीय तांत्रिक विद्यालयात संविधान मंदिर उभारले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास खात्याने हेच सत्य पाऊल उचलले आहे.

राज्यभरातील आयटीआय आणि शासकीय तांत्रिक विद्यालयात उभारण्यात येणाऱ्या या संविधान मंदिरांचे याच महिन्यात १५ ऑगस्ट २०२४ रोजी एकत्रित ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
