मालवण : मालवण तालुक्याचा मानाचा झेंडा उंचावत ॲड ऐश्वर्य वसुंधरा जनार्दन मांजरेकर यांची सेंट्रल अकादमी फॉर स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस (CASFOS), डेहराडून उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ३ दिवसीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे.
२४ ते २६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत आयोजित होणाऱ्या या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य विषय आहे – “वन आणि वन्यजीव संवर्धनात नागरिक व विज्ञानाची भूमिका”. या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणासाठी संपूर्ण भारतातून ३० निवडक प्रतिनिधींची निवड करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील ॲड ऐश्वर्य मांजरेकर यांचीही निवड सदर
प्रशिक्षणासाठी झाली आहे.
या शिबिरादरम्यान वनसंवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, नागरिकांचा सहभाग, तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण यावर सखोल चर्चा व प्रशिक्षण दिले जाणार आहे. ॲड ऐश्वर्य मांजरेकर हे विविध सामाजिक संघटनांच्या उपक्रमांत सदैव सक्रिय असतात. या यशामुळे मालवण तालुक्यात अभिमानाची भावना व्यक्त होत असून, स्थानिक युवक-युवतींसाठी ही प्रेरणादायी बाब ठरणार आहे . सदर प्रशिक्षणासाठी ॲड. ऐश्वर्य वसुंधरा जनार्दन मांजरेकर यांची निवड झाल्याबद्दल समस्त जिल्हावासियांतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
