उरण दि ३ (विठ्ठल ममताबादे ) : ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ ते १२:१५ वा.चे दरम्यान उरण पोलीस ठाणे व मोरा सागरी पोलीस ठाणे यांचे संयुक्तीक विदयमानाने उरण शहरामध्ये नशामुक्ती संदर्भात जनजागृती रॅली काढण्यात आली.या रॅलीत उरण एज्युकेशन सोसायटी, एन.आय.हायस्कुल व सिटीझन हायस्कुल चे विदयार्थी तसेच हद्दीतील प्रतिष्ठित नागरीक व पोलीस पाटील सहभागी झाले होते.
ही रॅली ही पेन्शन पार्क, (वैष्णवी हाॅटेल) उरण येथून सुरू होवून स्वामी विवेकानंद चौक, गांधी पुतळा मार्गाने, गणपती चौक, राजपाल नाका तेथून पालवी हाॅस्पीटल मार्गाने कामठा रोडने एन.आय.हासस्कुल याठिकाणी समाप्त करण्यात आली आहे. सदर ठिकाणी उपस्थित विदयार्थी व प्रतिष्ठित व्यक्तींना नशा मुक्ती संदर्भात पोलीस प्रशासनाच्या अधिकारी वर्गांतर्फे मार्गदर्शन करण्यात आले. व्यसनमुक्ती समुपदेशक दर्शन नाईक यांनी देखील व्यसन हा आजार आहे, त्याचे कुटुंब व समाजावर होणारे परिणाम आणि पुनर्वसनाचा मार्ग याबाबत मार्गदर्शन केले.सदर जनजागृती रॅली मध्ये शाळेचे ८ शिक्षक, ३०० विदयार्थी,३५ प्रतिष्ठित नागरीक व १५ पोलीस पाटील यांचेसह ०३ पोलीस अधिकारी व ३५ पोलीस अंमलदार तसेच मोरा सागरी पोलीस ठाण्याचे १ अधिकारी व १० पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.
ही नशा मुक्ती रॅली शांततेत पार पडली.विविध व्यसनपासून तरुण पिढीने दूर राहावे, व्यसन, मादक पदार्थ नशेचे पदार्थ सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम याबाबत समाजात जनजागृती व्हावी या अनुषंगाने नशामुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांनी दिली आहे.
