सिंधुदुर्गमध्ये १० डिसेंबरला बांगलादेश हिंदू न्याय यात्रा
ककणवली : बांगलादेशात हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांनी कळस गाठला आहे. बांगलादेशमधील हिंदूंवर धर्माच्या आधारावर होत असलेले अनन्वित अत्याचार थांबवावेत, यासाठी सिंधुदुर्गमध्ये १० डिसेंबरला बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढली जाणार आहे.
जागतिक मानवाधिकार दिनी १० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिंधुदुर्गनगरी ओरोस ते जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे निघणाऱ्या ‘बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत’ हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून बांगलादेशी हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडुया, असे आवाहन मालवण-कुडाळचे आमदार नीलेश राणे यांनी केले आहे.