गोवा येथे १३ डिसेंबरपासून होणार स्पर्धा
रत्नागिरी : गोवा येथे होणाऱ्या चौथ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून संकेता संदेश सावंत यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने तायक्वांदो अकॅडमी ऑफ वास्को आयोजित ही स्पर्धा पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इनडोर स्टेडियम पेडम म्हापसा गोवा येथे तीन दिवस होणार आहे.
दि. १३ ते १५ डिसेंबर २४ तीन दिवसात होणाऱ्या या खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी देशाच्या विविध राज्यातून केलेल्या पंच निवडीमध्ये महाराष्ट्र राज्यातून रत्नागिरी जिल्ह्यातील संकेता संदेश सावंत यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय पंच असणाऱ्या संकेता संदेश सावंत यांचे अभ्युदय नगर बहुउद्देशीय सभागृह, नाचणे रोड, रत्नागिरी येथे रत्नागिरी स्पोर्ट्स तायक्वांदो असोसिएशन यांच्या मान्यतेने तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र सुरू असून तीन वर्षांपूर्वी सर्व मुला मुलींना या ठिकाणी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे. स्वसंरक्षण ही काळाची गरज आहे. मुलं, मुली, महिला सर्वांनीच ही कला आत्मसात करणे स्वसंरक्षणाबरोबरच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी नक्कीच उपयुक्त ठरते. महिला प्रशिक्षक असणाऱ्या या प्रशिक्षण केंद्राचा परिसरातील इच्छुकांना चांगलाच फायदा होत आहे.
संकेता संदेश सावंत यांच्या या निवडीबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, सचिव मिलिंद पाठारे,
खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, रत्नागिरीतील तायक्वांदो प्रशिक्षक मिलिंद भागवत, शाहरुख शेख, राम कररा, प्रशांत मकवाना यांनी शुभेच्छा दिल्या.