https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

लांजातील डाफळेवाडी शाळेची परसबाग तालुक्यात दुसरी

0 24

लांजा : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेमधील परसबाग निर्मितीचा उपक्रम जि. प. शाळा लांजा डाफळेवाडी येथे जून २०२४ पासून अत्यंत उत्साहात राबविण्यात येत आहे. परसबागेच्या नुकत्याच करण्यात आलेल्या मूल्यमापनात तालुकास्तरावर जि. प. पू. प्रा. शाळा लांजा डाफळेवाडीचा दुसरा क्रमांक आला आहे.

शाळेच्या या अत्यंत नावीन्यपूर्ण व ज्ञानवर्धक प्रात्यक्षिक उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात व आनंदात सहभाग घेतला आणि सृजनशीलतेचा आनंददायी अनुभव विद्यार्थी प्रत्यक्ष घेतला.

या उपक्रमासाठी शाळेतील इ.१ली ते ७ वीच्या विद्यार्थी, शिक्षक व पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी जोरदार तयारी केली होती. या परसबागेतून विद्यार्थ्यांना निसर्गाचा प्रत्यक्ष सहवास लाभत असून, शेतीची माहिती आणि आवड निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. तसेच यामधून तयार होणाऱ्या पालेभाज्या विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात वापरल्या असल्याने विद्यार्थ्यांना अत्यंत सकस व पौष्टिक, चवीष्ट आहार मिळत आहे.


शाळेमध्ये परसबाग निर्मिती करताना आधुनिक शेती व यांत्रिक शेती, बैलांचे जोत व ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करून मशागत करून ,अळी तयार करून पाले भाजी, पडवळ, काकडी, टोमॅटो,मिरची,वांयगे,घेवडा, दोडका,कारली, झेंडूची झाडे बियाणे लावण्यात व पेरण्यात आली .
शिक्षणा सोबत मुलांना शेतीची आवड व शेतीविषयक माहिती मिळावी ह्यासाठी हा उपक्रम शाळे मध्ये राबविण्यात आला.
नुकतेच या उपक्रमाचे तालुकास्तरावर परीक्षण करण्यात आले. यासाठी गटशिक्षणाधिकारी श्री. सावंग, विस्तार अधिकारी सौ. हिरवे, केंद्रप्रमुख श्री.पावसकर, श्री. आयरे यांनी परसबागेचे शासन निकषांनुसार मूल्यमापन केले.

या तालुका स्तरीय मूल्यमापनामध्ये जि.प.पू.प्रा. शाळा लांजा डाफळेवाडीचा तालुक्यात दुसरा क्रमांक आला आहे.
शाळेत परसबाग राबविण्यासाठी गटशिक्षणाधिकारी श्री. सावंग, केंद्रप्रमुख श्री. पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. अनुजा पांचाळ, नगरसेविका सौ. दुर्वा भाईशेट्ये, उपाध्यक्ष राजेंद्र तुळसणकर, शाळा सुधार समिती सदस्य प्रसाद भाईशेट्ये, बाबू पांचाळ, ट्रॅक्टर मालक कैलास उपशेटे, बैल व नांगरमालक श्री.वसंत कुंभार, तुकाराम कुंभार, सौ.जान्हवी गांधी,श्री. मोहसीन खतीब,नरेश कुंभार, फिरोज नेवरेकर, सौ.मेघना दुबळे, सौ. संजीवनी पांचाळ, सौ.लाइका मुगारी, सौ.संजीवनी पांचाळ, सौ.पूजा शिगम, सौ. मनस्वी समगिस्कर, प्रभाकर कुंभार,श्री. सुभाष कुंभार, महेश पांचाळ, मंगेश पांचाळ,सौ.राजेश्वरी पोटफोडे, संजय तेरवणकर, राजेश कांबळे, सौ. नेवरेकर,
मुख्याध्यापक मनोज रेडिज, शिक्षिका सौ. दीपाली यादव, सौ. दीपा मुळ्ये, सौ. रूक्मिणी कदम-पाटील या सर्वांनी सहभाग घेतला. खास करून जागा मालक दिलीप तोडकरी, संजय तोडकरी, विलास तोडकरी यांनी परस बागेसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिल्यामुळे शाळेला परसबाग उपक्रम राबविता आला. याबद्दल श्री. तोडकरी बंधुचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.