उरण (विठ्ठल ममताबादे ) : सानपाडा, नवी मुंबई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे पारस काव्या कला जनजागृती संस्थेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्तने विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना महाराष्ट्रातील १०८ युवा युवतीना २०२४ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यामध्ये नेहा विशाल पाटील मु बोरखर हिला क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्यामुळे क्रीडारत्न पुरस्कार देण्यात आला. हर्षद वसंत पाटील वावंजे पनवेल यांना क्रीडा क्षेत्रातील चांगली विध्यार्थी घडविल्यामुळे त्यांना क्रीडा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच गोपाळ दिनकर म्हात्रे सारडे उरण यांना आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याने या सर्वांवर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.हा पुरस्काराने देण्यासाठी प्रमुख पाहुणे मंगेश चांदिवडे संस्था अध्यक्ष,शोभा चांदीवडे खजिनदार,दामोदर बेडेकर सचिव,सुरेश शेंडेकर समाज सेवक पुंडलिक म्हात्रे साहित्यिक, संजय बर्वे साहित्यिक, शंकर गोपाली हे मान्यवर उपस्थित होते.
