रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील कोळंबे येथे आपल्या व्यस्त कार्यकाळातून वेळ काढून राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा खात्याचे मंत्री उदय सामंत यांनी गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. ना. सामंत यांच्या मुलांसोबत खेळण्यामुळे गावकरी चकित झाले.

रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे गावातील खेळाडूंसोबत मैदानावर फलंदाजी करीत मुलांशी संवाद साधून खेळाच्या महत्त्वाबाबत चर्चा केली.
मुलांना नियमित खेळण्यासाठी आणि त्यामधून आत्मविश्वास व संघभावना विकसित करण्यासाठी ना. उदय सामंत यांनी प्रोत्साहित केले.

