मालवणमध्ये साकारणार कोकणातलं ‘मरिन ड्राईव्ह’!

मुंबई : कोकणातील पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर सिंधुदुर्गातील पर्यटन वाढीसाठी मुंबईतील मालवण जेट्टी ते दांडीपर्यंत प्रॉमिनाड्स बांधकामासह तेथील भाग विकसित केल्या जाणार आहे.

कुडाळ मालवणचे आमदार नीलेश राणे यांनी महाराष्ट्र सागरी मंडळ (मेरिटाइम बोर्ड)च्या अधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे बैठक घेतली. या बैठकीत देवबाग संगम येथे अत्याधुनिक पद्धतीचा ‘ग्रोयसं’ बंधाऱ्याची उभारणी करणे, पर्यटनवाढीसाठी मालवण जेट्टी ते दांडीपर्यंत मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रॉमिनाड्स बांधकाम करणे आणि इथून पुढे भविष्याच्या गर्दीचा अंदाज घेऊन फक्त बंधारा नाही तर रस्ता कम बंधारा असे काम हाती घेण्याचा निर्णय या बैठकीत झाला.

या कामांसंदर्भात तसेच इतर अनेक प्रलंबित व प्रस्तावित विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE