रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या खेड स्थानकात एक्झिक्युटिव्ह लाउंज चा शुभारंभ करण्यात आला. कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्याहस्ते फीत कापून तर मुख्य वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट, उपमुख्य वाणिज्य प्रबंधक राजेंद्र घोलप आणि कोकण रेल्वेच्या विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या वातानुकूलित एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये प्रवाशांच्या सुविधे करिता 22 आरामदायी आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे उपलब्ध स्क्रीन वर प्रवाश्यांना मार्गावर धावणाऱ्या विविध ट्रेन्सच्या आगमन निर्गमन ची माहिती उपलब्ध होणार आहे.
प्रवाश्यांकरिता येथे छोटेखानी कॅफेटेरिया सुविधा हि असणार आहे.कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागात चिपळूण पाठोपाठ एक्झिक्युटिव्ह लाउंज उपलब्ध असलेले खेड दुसरे स्थानक बनले आहे. येणाऱ्या काळात कोकण रेल्वेच्या मार्गावर प्रवाश्याकरीता विविध सुविधा उपलब्ध करून देत आहोत. कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या वर्षात अशा पद्धतीची सहा ते सात एक्झिक्युटिव्ह लाउंज उभी करण्याचा आमचा निर्धार आहे, असा विश्वास यावेळी कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी व्यक्त केला.
