- ‘गव्हर्नन्स नाऊ’ कडून सन्मान सोहळा
नवी दिल्ली : गव्हर्नन्स नाऊ यांच्या कडून देण्यात येणाऱ्या मानाच्या दोन सन्मानांनी कोकण रेल्वेला गौरवण्यात आले आहे. लीडरशिप अवॉर्ड आणि इन्फ्रास्ट्रक्टर लीडरशीप अवॉर्ड अशा दोन पुरस्कारांनी कोकण रेल्वेला दिल्लीत सन्मानित करण्यात आले.
गव्हर्नन्स नाऊ यांच्या कडून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना सन्मानित करण्यात येते.यावर्षीच्या अकराव्या गव्हर्नन्स नाऊ पुरस्कारासाठी कोकण रेल्वेची निवड करण्यात आली.
कोळसा आणि खाण राज्यमंत्री श्री सतीश चंद्र दुबे आणि माजी खासदार श्री. सत्यपाल सिंह यांच्या हस्ते कोकण रेल्वेला गव्हर्नन्स नाऊकडून नेतृत्व पुरस्कार आणि पायाभूत सुविधा नेतृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोकण रेल्वेचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा आणि वर्कस डिरेक्टरी श्री आर के हेगडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
