जायंटस वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन २ ड च्या अध्यक्षपदी गजानन गिडिये

रत्नागिरी : कोकण स्थित, जायंटस वेलफेअर फाउंडेशन, फेडरेशन २ड च्या सन २०२५ सालच्या अध्यक्षपदी श्री. गजानन गिडिये यांची नियुक्ती जायंटस विश्व अध्यक्षा शायना. एन. सी. यांनी केली होती. सन २०२५ सालच्या फेडरेशन अध्यक्ष आणि त्यांचे सर्व १६ कौन्सिल सदस्य यांचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळा नुकताच २३ फेब्रुवारी रोजी पाटीदार भवन, रत्नागिरी येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि जायंटस प्रार्थनेने झाली. या समारंभाला जायंटस्चे केंद्रीय समिती सदस्य, डॉ. सतीश बापट आणि अँड. विलासराव पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच विशेष समिती सदस्य, डॉ. मिलिंद सावंत, श्री. संजय पाटणकर, माजी अध्यक्ष, श्री.विनायक राऊत, श्री. भूषण मुळ्ये यांच्या उपस्थितीत हा शपथविधीचा सभारंभ पार पडला.
या कार्यक्रमा मध्ये निवेंडी प्राईड या नूतन ग्रुपच्या अध्यक्ष आणि सर्व सदस्यांना देखील शपथ देण्यात आली.

रत्नागिरीमधील सहा ग्रुप्स चे अध्यक्ष आणि त्यांचे कार्यकारिणी सदस्य यांना देखील शपथ देण्यात आली. ह्या कार्यक्रमामध्ये सन २०२४ साली उत्कृष्ठ सामाजिक काम केलेले तीन ग्रूप, रत्नागिरी, रत्नागिरी सिटी सहेली आणि कुवारबाव सहेली यांना रोख रक्कम आणि प्रशस्त्री पत्रक देऊन गौरविण्यात आले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार, फेडरेशन उपाध्यक्षा, सौ. माधुरी कांबळे यांनी मानले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE