होळी विशेष गाड्यांमुळे दादर ते रत्नागिरी प्रवास होणार अधिक सोयीस्कर!


रत्नागिरी : होळीच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने दादर ते रत्नागिरी दरम्यान विशेष होळी गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

रत्नागिरीपर्यंत होळी विशेष गाड्यांचे वेळापत्रक :

  • ०११३१ दादर रत्नागिरी होळी विशेष गाडी:
  • ११, १३ व १६ मार्च, २०२५ रोजी दुपारी १४:५० वाजता दादर येथून सुटेल.
  • रात्री २३:४० वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
  • ०११३२ रत्नागिरी दादर होळी विशेष गाडी:
  • १२, १४ आणि १७ मार्च, २०२५ रोजी पहाटे ४:३० वाजता रत्नागिरी येथून सुटेल.
  • दुपारी १३:२५ वाजता दादरला पोहोचेल.
    गाड्यांचे थांबे:
    या गाड्यांना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबे असतील.
    प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती:
  • होळीच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • प्रवाशांनी या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन  रेल्वेकडून करण्यात आले आहे.
  • या गाड्यांमुळे कोकणात होळीसाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE