उरण (विठ्ठल ममताबादे ) : शिवसेना शिंदे गटाचे उरण तालुकाप्रमुख महेंद्र पाटील आणि उरण शहर प्रमुख सुलेमान शेख यांच्या नियोजनाने उरण चार फाटा येथे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांचा वाल्मिक कराडने निर्घृणपणे केलेल्या हत्येच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात युवा सेना सचिव रुपेश पाटील , उरण विधानसभा प्रमुख मनोज घरत,चाणजे विभागीय उपतालुकाप्रमुख प्रशांत म्हात्रे,उपतालुका प्रमुख हेमंत भोईर,चाणजे पंचायत समिती विभाग प्रमुख कृष्णा पाटील, नवघर विभाग प्रमुख गणेश घरत,महिला आघाडी चाणजे विभागप्रमुख बेबीताई पाटील, नवघर विभागीय उपतालुका प्रमुख अमित ठाकूर, उलवे शहर प्रमुख संदीप वायंगणकर तसेच प्रथम शेठ पाटील, सुधीर पाटील, शंकर पाटील आणि असंख्य शिवसैनिक व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या आंदोलनाच्या माध्यमातून संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध करण्यात आला आणि दोषींना फाशीची शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली.
