विज्ञानरंजन स्पर्धा परीक्षेचा 22 जून रोजी पारितोषिक वितरण कार्यक्रम
रत्नागिरी : माध्यमिक शिक्षण विभाग व रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षेचे पारितोषिक वितरण कार्यक्रम बुधवार (दि.22 जून) रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय अध्यापक महाविद्यालय रत्नागिरी येथे होणार आहे.
शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रमा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि एस.आर.दळवी फौंडेशनचे अध्यक्ष रामचंद्र दळवी,जे.एस.डब्ल्यू. जयगडचे अनिल दधिच , माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सौ.सुवर्णा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
कार्यक्रमात तालुका आणि जिल्हास्तरीय विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, मंडळाचे पदाधिकारी यांनी केले आहे.