कोकण रेल्वे मार्गावर एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस ६ जुलैपासून पुन्हा धावणार!
मडगाव, रत्नागिरी वसई, कोटामार्गे दिल्लीला जाणार
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्ग धावणारी एर्नाकुलम ते हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट साप्ताहिक एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गाडी क्रमांक 22655 व 22656 या क्रमांकाने ही गाडी कोकण रेल्वे मार्गे धावते. या गाडीच्या फेऱ्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.एर्नाकुलम येथून ही गाडी दिनांक ६ जुलैपासून दर बुधवारी रात्री दोन वाजून 15 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ती दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकावर रात्री दहा वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल.
22656 या क्रमांका सही गाडी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकावरून दिनांक ८ जुलैपासून दर शुक्रवारी पहाटे पाच वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ती एर्नाकुलम ला पहाटे दोन वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल.
कोकण रेल्वे मार्गे धावताना ही गाडी मडगाव करमाळी रत्नागिरी पनवेल वसई रोड ही स्थानके घेत गुजरातमधील वडोदरा राजस्थान मधील कोटा या स्थानकांवर थांबा घेऊन दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकावर पोहोचणार आहे.
स्लीपर वातानुकूलित तसेच इकॉनोमी थ्री टायर श्रेणीच्या अशा एकूण 18 डब्यांचा ही गाडी कोकण रेल्वेमार्ग धावणार आहे