मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये असं आवाहन
रत्नागिरी दि.21:- भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार, 20 जून ते 24 जून 2022 या कालावधीत दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा या ठिकाणी ताशी ४०-५० कि.मी ते ६० कि.मी. वेगाने यादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला असून मच्छीमारानी संबधीत कालावधीत समुद्रात जावू नये. तसेच 20 जून ते 25 जून 2022 या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

