केवळ एका स्कॅनरवरून उपलब्ध होणार राज्यातील सर्व आरोग्य योजना!

मुंबई : शिवसेना वैद्यकीय मदत माहिती पत्रकाचे प्रकाशन राजाचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.  हा महत्त्वपूर्ण उपक्रम महाराष्ट्रातील गोरगरीब रुग्णांसाठी एक मोठी मदत ठरणार असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. माहितीपत्रकाच्या प्रकाशन सोळावे येथे बोलत होते.

यावेळी बोलताना ना. उदय सामंत म्हणाले की, या माहिती पत्रकाच्या माध्यमातून एका स्कॅनरवरून महाराष्ट्र शासनाच्या सर्व आरोग्य योजना सहज उपलब्ध होतील, ज्यामुळे गरजूंना योग्य आणि तातडीची वैद्यकीय मदत मिळवणे अधिक सुलभ होईल.
आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक मोठा टप्पा आहे!
शिवसेना नेहमीच शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या हितासाठी कटिबद्ध आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE