Good News | कोकण रेल्वे विलीनीकरण प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्र्यांना कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीनीकरणासाठी दिले पत्र 

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना लेखी पत्र पाठवून महाराष्ट्र सरकारचे वतीने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यात यावे, यासाठी संमती दिली असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून प्राप्त झाले आहे.

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण व्हावे यासाठी कोंकण विकास समिती समवेत अनेक रेल्वे संघटना यांनी आवाज उठवला होता. कोंकण विकास समितीचे वतीने रेल्वे अभ्यासक श्री. अक्षय महापदी यांनी कोंकण रेल्वेची स्थापना, कोंकण रेल्वेचे उत्पन्न आणि कोंकण रेल्वेचे विकासासाठी घ्यावे लागणारे कर्ज तसेच भविष्यातील कोंकण रेल्वेची स्थिती याबाबत अभ्यासपूर्ण लेखजोगा पटवून दिला होता; ज्यामध्ये महाराष्ट्रातील आमदार श्री प्रवीण दरेकर, शिवसेनेचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे तत्कालीन खासदार विनायक राऊत, खासदार नरेश म्हस्के, खासदार रवींद्र वायकर, खासदार नारायण राणे, खासदार अरविंद सावंत यांनीही हा प्रश्न प्रखरपणे मांडला होता.

कोकण रेल्वेच्या संदर्भातील या महत्त्वाच्या प्रश्नावर सर्वांचेच योगदान सार्थकी लागून एक दिवस रेल्वे बोर्ड अधिकृतरित्या कोंकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण झाले असे शिक्कामोर्तब करण्याचा मार्ग मुख्यमंत्र्यांच्या या लेखी पत्रामुळे मोकळा झाला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE