रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या २ लाख ८९ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला.
या संदर्भातील अधिक माहितीनुसार ५ जुलै रोजी मध्यरात्री २.३० च्या सुमारास येथील रेल्वेस्थानकात ही घटना घडली. एक महिला १२६२० क्रमांकाच्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या बोगी नं. ५३ मधील ६० नंबरच्या आसनावरून रत्नागिरी ते मुंबई असा प्रवास करत होती. एक्स्प्रेस येथील रेल्वेस्थानकात आली असता चोरट्याने त्या झोपल्या असल्याची संधी साधत सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास केली. बॅगेतील दागिने व रक्कम काढून घेत बॅग रेल्वे डब्यातील टॉयलेटमध्ये फेकत पलायन केले. सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरीस गेल्याचे महिलेच्या लक्षात येताच धक्का बसला. नंतर येथील पोलीस ठाणे गाठत रितसर तक्रार नोंदवली.
- हे देखील अवश्य वाचा : Konkan Railway | दादर- सावंतवाडी राज्यराणीला तुतारी एक्सप्रेस का म्हणतात?
छोटा भीमचा रेल्वे प्रवाशांना मोठा संदेश!
पनवेलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सप्टेंबरपासून उड्डाण!














