दरड हटवताच रघुवीर घाटात पुन्हा रस्ता खचला

  • उपाययोजनेची कांदाटी खोऱ्यातून मागणी

खेड  : यंदाच्या पावसाळ्यात काही दिवसापूर्वीच रत्नागिरी तसेच सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात दरड कोसळण्याच्या दोन घटना घडल्याचच्या पाठोपाठ शुक्रवारी पुन्हा या घाटातील रस्ता खचला आहे. मात्र असे असले तरी या मार्गावरील  वाहतूक  सुरूच आहे.
रघुवीर घाटात कोसळलेली दरड हटवून काही तास उलटले नाही तोच शुक्रवारी सकाळी सातारा जिल्ह्याला खेड तालुक्याशी जोडणाऱ्या रघुवीर घाटातील रस्ता खचला आहे.

रघुवीर घाटात शुक्रवारी सकाळी खचलेला रस्ता ( छायाचित्र सौजन्य : नागेश भोसले खोपी )

सातारा तसेच रत्नागिरी जिल्ह्यांचा दुवा असलेला खेड तालुक्यातील रघुवीर घाट हा मागील काही वर्षांपासून पर्यटकांसाठी पसंतीचा ठरला आहे. पावसाळी पर्यटनासाठी तर या घाटात अनेक पर्यटक आवर्जून हजेरी लावतात. मात्र गेल्या काही वर्षात या घाटात दरडी कोसळणे तसेच रस्ता खचणे अशा घटनांमुळे पर्यटकांसह कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पर्यटनासाठी रघुवीर घाटाचे असलेले महत्त्व लक्षात घेता आधीच्या घटनांपासून बोध घेऊन बांधकाम खात्याने या घाटात धोकादायक ठिकाणी संरक्षक कठडे उभारून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
श्री. भूषण मोरे, युवा सेना, संघटक, कांदाटी विभाग, ता. खेड.

शुक्रवारी घाटात रस्ता खचल्याची माहिती युवा सेनेचे विभाग प्रमुख भूषण मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला दिली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता दीपक पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन खचलेल्या रस्त्याची पाहणी केली.
घाटात वाहतुकीत वरचेवर येणारा व्यत्यय लक्षात घेता हा घाट रस्ता अधिक सुरक्षित बनवण्यासाठी संरक्षक कठड्यासारख्या कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी कांदाटी खोरेवासीयांची मागणी आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE