ना. नितेश राणे यांनी रत्नागिरीतील प्रसिद्ध राधाकृष्ण मंदिराला घेतले दर्शन!

रत्नागिरी: राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे यांनी रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध श्री राधाकृष्ण मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेतले. या प्रसंगी श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

​यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजन मलुष्टे, उपाध्यक्ष वीरेंद्र वणजू, सेक्रेटरी मकरंद खातू यांच्यासह योगेश मलुष्टे, मिलिंद दळी, सतीश दळी, हेमंत वणजू, दादा दळी, मनोर दळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची पाहणी मंत्री महोदयांनी केली. त्यांनी सध्या सुरू असलेल्या राधा कृष्ण स्पर्धेचे अवलोकन करून त्यात सहभागी झालेल्या चिमुकल्यांना शुभेच्छा दिल्या.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE