https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

केंद्रीय विद्यालय एन. ए. डी. करंजा शाळेतील पालकांचे एन ए. डी ते उरण बससेवा सुरू करण्याची मागणी

0 138

पालकांचे बस आगाराला लेखी निवेदन

उरण (विठ्ठल ममताबादे): गेली दोन वर्षं कोविडच्या वाढत्या प्रसारामुळे शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.शाळा सुरू करण्याविषयी निर्बंध ,ऑनलाईन  अभ्यासक्रम पूर्ण करणे हे काही गरीब घरातील विद्यार्थ्यांना अशक्य होत असताना आता सर्व व्यवहार सुरळीत चालू असून शाळेतील मुलांचा किलकिलाट  कानावर पडु लागला आहे.अर्थातच आता सर्व शाळा, महाविद्यालये सुरु झाले आहेत.पण केंद्रीय विद्यालय एन ए. डी. करंजा उरण या शाळेचे विद्यार्थी एका वेगळ्याच समस्येला सामोरे जात आहेत ते म्हणजे  उरण व उरणच्या आसपासच्या परिसरातील बरेच विद्यार्थी शाळेत येण्याजाण्यासाठी उरण बस स्थानकातून सूटणाऱ्या एन. ए. डी -उरण या बसने शाळेत ये – जा करीत असतात. परंतु कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे व रोड दुरूस्तीच्या कामांसाठी ही  एसटी बससेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे या बससेवेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे . त्यांना  खाजगी वाहनांतून, जास्तीचे पैसे खर्च करून प्रवास करणे त्रासदायक होत होत आहे .महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ४/१०/२०२१ पासून कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून हे केंद्रीय विद्यालय एन .ए .डी . करंजा उरण सुरु झाले आहे.  तत्पूर्वी सदरची ही बससेवा( उरण ते एन ए डी करंजा मार्ग ) कौविड-१९ मुळे अगोदरच रस्ता दुरूस्तीच्या निमित्ताने मोठमोठे खड्डे केल्यामुळे तसेच कोरोना मुळे जवळपास ४ वर्षं या मार्गावर बससेवा बंदच आहे.या परिस्थितीचा फायदा खाजगी वाहनांनी घेतला. व वाजवीपेक्षा जास्त पैसे भरून शाळेतील विद्यार्थांना नाईलाजाने प्रवास करावा लागत होता. विद्यार्थ्यां सोबतच या बसने शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही ही बससेवा लाभदायक ठरत होती. या बसमध्ये उरण व उरणच्या आसपासच्या परिसरातील विद्यार्थी प्रवास करत होते. त्यानंतर  लॉकडाऊन आणि रस्तादुरूस्ती  या कारणांचीही भर पडली. म्हणजे गेली ४ वर्षे ते आजपर्यंत ही बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत आहे.

     या संदर्भात विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्यासाठी सुलभ व्हावे यासाठी एस टी बससेवा सुरू करण्याबाबत शाळेच्या पालका कडून प्रयत्न सुरु झाले . विद्यार्थी शाळेच्या  वेळेवर ये-जा करतील या अनुषंगाने एन ए. डी. उरण बससेवा शाळेच्या वेळेत सुरू व्हावी याकरीता उरण एस टी डेपोचे महाप्रबंधक  सतिश मालचे यांच्या कडे या शाळेतील पालकवर्गाने एकत्र येऊन शुक्रवार दिनांक २४/६/२०२२ रोजी पत्रकार तृप्ती भोईर यांच्या सहकार्याने या समस्या बाबत लेखी निवेदन सादर केले. व या निवेदनाची पुर्तता लवकरात लवकर व्हावी अशी मागणी समस्त पालकवर्गा तर्फे करण्यात आली.हे निवेदन सादर करतेवेळी रोशनी कांबळे, सिमा वाल्मिकी, रेखा जाधव, ज्योती पवार, शांती सरोज, रेश्मा कदम, मंगलदास कांबळे, मंदार आसरकर, विश्वकर्मा किशन, रमेश कातकरी , मनिषा घळवट, नुर शेख, रवि आरेकर, संगिता जाधव, राजु क्षत्रिय, रोशन पासवंत, सुभाष गुलख, विलास गायकवाड, संजय गायकवाड, कालिक शेख, मेघा जाधव, आम्रपाली गायकवाड आदी पालकवर्ग उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.