देवरूखच्या कवियत्री भारती राजवाडे यांच्या साहित्य-कवितांची जागतिक ग्रंथामध्ये नोंद!

देवरुख : सीता ट्रस्ट आहिल्या नगर, समर्थ फाउंडेशन पुणे आणि जिजाई बहुउद्देशीय सेवा संस्था कल्याण (महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमांतर्गत नुकताच ‘आई’ हा काव्य महोत्सव साहित्य पुरस्कार सोहळा दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी पुणे येथे संपन्न झाला.

मातृत्वाच्या भावनेला शब्दरूप देणाऱ्या ‘आई’ या राज्यस्तरीय काव्यसंग्रहाने अभूतपूर्व यश संपादन केले असून या ग्रंथाची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. हा सर्वात मोठा मराठी कविता संग्रह म्हणून त्याची नोंदणी झाली आहे. 1121″आई’ या ग्रंथांमध्ये समाविष्ट असणाऱ्या राज्यभरातील सर्व साहित्यकांची जागतिक ग्रंथांमध्ये नोंद होणे ही सर्व साहित्यकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

देवरुख येथील कवयित्री सौ. भारती राजवाडे यांच्या साहित्य कवितांची जागतिक ग्रंथामध्ये नोंद झाली असून लवकरच प्रमाणपत्र त्यांच्याकडे सुपूर्त होईल.

या उपक्रमातील सर्वेसर्वा आचार्य श्री अंदानी सर व सर्व आयोजक मंडळांनी महाराष्ट्रातील सर्व कवींना एकत्र आणून मातृभावनेवर आधारित असा काव्यसंग्रह तयार करणे हे एक आव्हानात्मक पण प्रेरणादायी कार्य होते, असे आयोजकांनी सांगितले.

या ग्रंथाचे संपादन आणि संकलन अत्यंत बारकाईने करण्यात आले असून मराठी साहित्यातील हा एक आगळावेगळा उपक्रम ठरला आहे. ‘आई’ या राज्यस्तरीय काव्यसंग्रहाची वर्ल्ड रेकॉर्डमधील नोंद ही मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानाची बाब ठरली असून, मातृभावनेला अर्पण केलेला हा ग्रंथ पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE