मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्लीत आगमन
नवी दिल्ली, दि. ६ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या शासकीय भेटीवर असून आज त्यांचे येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.
आगमनानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ राष्ट्रीय समितीच्या तिसऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. तसेच, उद्या रविवार (दि.७) रोजी आयोजित नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या ७ व्या बैठकीत सहभागी होणार आहेत.
भंडारा व गोंदिया येथील महिला अत्याचार प्रकरणी पोलीस कसून तपास करीत आहेत. पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यात येईल. यात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.