जीजीपीएस प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या टिफिनमध्ये तिरंगामय पदार्थ

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

रत्नागिरीत : सध्या हर घर तिरंगा अभियान सुरु आहे. इथल्या शाळांनी देखील उत्स्फुर्त असा सहभाग नोंदवलाय.रत्नागिरीतील जीजीपीएस प्रशालेत अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी चक्क तिरंगा रंगाचे  विविध पदार्थ आपल्या टिफीनबाँक्स मधून आणले होते.

इडली, घावणे, लाडू असे तिरंगामय पदार्थ आणत या अमृत महोत्सवानिमित्त अनोख्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त असा सहभाग नोंदवला तर पालकांसाठीदेखील पाककला स्पर्धा घेण्यात आली. हर घर तिरंगा या अभियानाला उत्तम असा प्रतिसाद शाळांबरोबरच जिल्ह्यात इतर भागांमध्ये देखील पहायला मिळत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE