रत्नागिरी पॅसेंजर पूर्वीप्रमाणेच दादरपर्यंत चालवण्यासह दादर- चिपळूण नवीन गाडी सोडण्याची मागणी
ना. रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन विषय मार्गी लावणार : खा. कोटक
मुंबई : कोकण विकास समिती आणि जल फाउंडेशन कोकण विभाग तसेच खेड तालुका कोकण रहिवाशी मंच दिवा यांच्यावतीने कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांची शनिवार दि. २२ ऑक्टोबर २०२२ दुपारी १२ वजता त्यांच्या मुलंड येथील सेवालय या कार्यालयात भेट घेण्यात आली. त्यांच्याकडे कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या मागण्यासंदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले.
खा. मनोज कोटक यांच्याकडे कोकण विकास समिती तसेच जल फाउंडेशनने पुढील मागण्यांच्या पूर्ततेसाठी आग्रह धरला आहे.
१. दादर आणि चिपळूण दरम्यान नवीन रोज धावणारी गाडी सुरू करणे
२. दादर – सावंतवाडी दरम्यान दोन्ही दिशांना दिवसा धावणारी आणि प्रत्येक तालुक्यात थांबणारी नवीन गाडी सुरू करणे
३. ५०१०३/५०१०५ रत्नागिरी पॅसेंजर कोरोना आधी जशी चालवली जात होती तशीच पूर्वीप्रमाणे दादरपर्यंत चालवणे
४. १०१०५/१०१०६ सावंतवाडी दिवा एक्सप्रेसचे काही अनारक्षित डबे दिव्यासाठी राखीव ठेवून गाडी दादरपर्यंत चालवणे
५. १२०५१/१२०५२ जनशताब्दी एक्सप्रेस, २२११९/२२१२० तेजस एक्सप्रेस, १२६१७/१२६१८ मंगला एक्स्प्रेस, २२११३/२२११४ लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली एक्सप्रेस, १२२०१/१२२०२ गरीबरथ एक्सप्रेस, २२११५/२२११६ लोकमान्य टिळक टर्मिनस करमळी एक्सप्रेस, २२६३० तिरुनेलवेली- दादर एक्सप्रेस, १२१३४ मंगळूरू -मुंबई एक्सप्रेस आणि २२४७५/२२४७६ कोइंबतूर हिसार एक्सप्रेस या गाड्यांना खेड येथे थांबा देणे.



यापैकी दादर -चिपळूण नवीन गाडी, दादर -सावंतवाडी नवीन गाडी आणि खेड येथील वाढीव थांबे हे अत्याआवश्यक विषय अग्रक्रमाने हाताळून टप्प्याटप्प्याने इतर विषय हाताळण्याची विनंती खासदार कोटक यांच्याकडे करण्यात आली.
या भेटीदरम्यान खासदार मनोज कोटक यांनी या प्रकरणी लक्ष घालून रेल्वे राज्य मंत्री माननीय श्री. रावसाहेब दानवे यांच्यासोबत प्रत्यक्ष बैठक घेऊन सर्व विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. जयवंत शंकरराव दरेकर, जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितिन सखाराम जाधव, श्री. अक्षय मधुकर महापदी, श्री सतीश निकम अध्यक्ष खेड तालुका रहिवाशी मंच दिवा
श्री. मंगेश महाडिक, श्री. विलास यादव,
श्री. नामदेव निकम, श्री. रुपेश जाधव, श्री. सचिन म्हादलेकर, श्री. महेंद्र पास्ते, श्री. निलेश पाटणे, श्री. प्रवीण उतेकर, श्री. विशाल देवळे, श्री. मंगेश शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.














