रुचिरा भांडुपच्या पराग विद्यालयाची माजी विद्यार्थिनी
देवरूख (सुरेश सप्रे) : मुंबई-भांडुपमधील महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या पराग विद्यालयाची माजी विद्यार्थीनी व खेड तालुक्यातील चिरणी गावची सुकन्या रूचिरा रविंद्र जाधव हिची कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बाँस मराठी सिझन ४ या कार्यक्रमात प्रवेशकर्ती झाली आहे. आपली छोट्या पडद्यावर व चित्रपटात छाप पाडल्यानेच तिची बिग बाँस मधील एन्ट्री उत्सुकता वाढविणारी आहे.
रुचिराने २००८मधे सोबत या चित्रपटाद्वारे सिनेमाक्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर कलर्स मराठीच्या तुझ्या वाचून करमेना या मालिकेतून तीने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.. यानंतर तिने माझी पत्नी सौभाग्यवती,
बे दुणी दहा, प्रेम, यामधे महत्वाच्या भूमिका केल्यावर तीेने माझ्या नवर्याची बायको या मालिकेत आपला ठसा उमटवत वेगळी ओळख निर्माण केली, तीला हस्तकलेसह विविध कलांची आवड आहे. तीने पराग विद्यालय भांडूप, मधे शालेय शिक्षण घेत असताना विविध स्पर्धांमधे सहभाग घेत अनेक बक्षिसे पटकावली होती.
अशा या मराठमोळ्या कोकणकन्येला बिग बाँस मधील कार्यक्रमात आँनलाईन व्होटिंग करून भरभरून प्रतिसाद देवून सहकार्य करावे असे आवाहन तिचे वडील रविंद्र जाधव व पराग विद्यालयाचे सचिव माजी आम. सुभाष बने. संचालक व ठाकरे सेनेचे भांडूपचे उपविभाग प्रमुख पराग (बबलू) बने यांनी केले आहे.

