राजापूर : मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर आणि माय राजापूर संस्था, राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने
महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत रविवार दि. ६ नोव्हेंबर रोजी कला मंदिर, राजापूर हायस्कूल येथे सकाळी 10 ते 2 यावेळेत स्त्रियांसाठी मार्गदर्शन व मोफत तपासणी शिबीर आयोजित केल्याची माहिती माय राजापूर संस्थेचे अध्यक्ष जगदीश पवार- ठोसर यांनी दिली.
मोरया हॉस्पिटल कोल्हापूरच्या पोटविकार तज्ञ डॉ.संगीता निंबाळकर या रुग्णांना तपासणार असून यावेळी त्या उपस्थित स्त्रियांना मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. संगीता निंबाळकर या गेली वीस वर्षाहून अधिक काळ वैद्यकीय सेवेत असून त्यांनी आजपर्यंत अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत.तरी सर्व महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
या आरोग्य शिबीराचा लाभ जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी व आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी माय राजापूर संस्थेचे श्री. सुबोध कोळेकर, श्रीम. प्रणोती भोसले, सौ. दीपाली पंडित, सुधा चव्हाण,श्री. संदीप देशपांडे, श्री. नित्यानंद पाटील, श्री. हृषीकेश कोळेकर विशेष मेहनत घेत आहेत.

