रत्नागिरी : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आज येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र ऑलम्पिक स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राष्ट्रवादीला मानवंदना देण्यात आली. यावेळी स्टेडियमवर गुणवंतांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये ऑलिंपिक विजेत्या खेळाडूंना राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.















